Pushpa 2 Trailer अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने २०२१ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील डायलॉग्स, गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल या सर्वांमुळे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत. या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून त्याचा ट्रेलर आला आहे. तीन वर्षानंतर सिनेमाचा दुसरा भाग येणार असून बहुचर्चित ‘पुष्पा २’ चा ट्रेलर पटनामध्ये मोठ्या सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन, पुष्पाच वाढत जाणार साम्राज्य ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे, ‘पुष्पा फायर नाही वाईल्ड फायर है’ हा ट्रेलर मधील डायलॉग सुद्धा या ट्रेलरला लागू होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा २ द रुल’ (पुष्पा २) चा २. ४८ सेकंदाचा ट्रेलर खरच वाईल्ड फायर आहे. जंगलात काळोखात हत्तींच्या आवाजात सुरु होणाऱ्या ट्रेलरमध्ये ‘पुष्पा’ प्रमाणेच लाल चंदनाची तस्करी आणि त्यातून येणारे पैसे दाखवले आहे, सिनेमाच्या नावाप्रमाणे ‘पुष्पा’ या सिनेमात राज्य (रुल) करताना दिसणार आहे. कारण ट्रेलरच्या सुरुवातीला पुष्पा कोण आहे ? हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो एक ब्रँड असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे. याच डायलॉसह ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनची ग्रँड एंट्री दाखवली आहे. हेलिकॉप्टर मधून तर कधी मागे मोठ्या गाड्या पुढे पुष्पा अशी अल्लू अर्जुनची एंट्री दाखवली गेली असून तो सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमात रूल करणार असं दिसतय.

हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…

फहाद फासिलची एंट्री आणि…

ट्रेलर जसा पुढे जातो तस रश्मिका मंदानाच पात्र दाखवण्यात आलं आहे.”श्रीवल्ली मेरी बायको…” असा डायलॉग अल्लू अर्जुन म्हणतो. अल्लू अर्जुनच्या या डायलॉगसह त्यांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. रश्मिकाच्या पात्रानंतर फहाद फासिलची एंट्री दाखवण्यात आली असून तो फार क्रूर दाखवण्यात आला आहे. फहाद फासिल एस पी भंवर सिंग या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. एस पी भंवर सिंग पुष्पाच्या माणसांना मारत त्याच्यासाठी एक आव्हान निर्माण करतो.फहाद फासिलबरोबरच सिनेमातील सगळ्या व्हिलनचे दृश्य ट्रेलरमध्ये दाखवले गेले असून एकटा पुष्पा आणि बाकी सर्व अशी फाईट बघायला मिळणार आहे.


पाहा ‘पुष्पा २’ चा ट्रेलर –

मराठमोळ्या श्रेयस तळपतेच्या आवाजातील डायलॉग्स

पुष्पा एकटा जरी असला तरी तो ‘पुष्पा का उसुल करनेका वसूल’ म्हणत सर्व शत्रूंशी एकट्याने भिडताना दाखवला आहे. मात्र हा डायलॉग आणि ट्रेलरमधील सर्व डायलॉग मराठमोळ्या श्रेयस तळपतेच्या आवाजात ऐकून प्रेक्षक नक्की चित्रपटगृहात जाणार असं दिसत आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन, फायटिंग सीन्स, हे भारी दृश्य टिपलेल्या कॅमेरा फ्रेम्स, स्टंट्स यांसह ट्रेलर जसा पुढे जातो तेव्हा पुष्पा सातासमुद्रापार त्याच्या शत्रूंना भिडायला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय. कारण ‘पुष्पा को नॅशनल खिलाडी समझा क्या पुष्पा इंटरनॅशनल खिलाडी है ‘ असं अल्लु अर्जुन म्हणतो.

हेही वाचा…‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”

ट्रेलरच्या शेवटी सिनेमा कसा असेल हे डायलॉग वरूनच कळत. ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा फायर नाही वाईल्ड फायर है’ हा डायलॉग आहे. सिनेमासुद्धा असाच असेल अशी अपेक्षा चाहते करत असून सिनेमा ५ डिसेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 trailer allu arjun returns with wild action rashmika mandanna fahadh faasil psg