Pushpa 2 Worldwide Box Office Collection Day 11 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. ५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना ‘पुष्पाराज’ पाहायला मिळाला होता. प्रदर्शनाआधीच हा सिनेमा हजार कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. तो अंदाज खरा ठरला असून, जगभरात या चित्रपटाने १ हजार ३२२ कोटी कमावले आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२१ मध्ये ‘पुष्पा’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यानंतर आता तब्बल ३ वर्षांनी आलेला ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : EMI भरण्यासाठी नावडते चित्रपट केले; विवेक ओबेरॉय म्हणाला, “यशाचं मोजमाप वाढदिवसाला येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या संख्येवरून…”

‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) चित्रपटाने प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी किती कोटींची कमाई केलीये जाणून घेऊयात…अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला छप्परफाड कमाई केल्याचं पाहायला मिळालं. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाने ११ व्या दिवशी म्हणजे रिलीजनंतर दुसऱ्या रविवारी तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. अकराव्या दिवशी एका दिवसात ७५ कोटींची कमाई केल्याने ‘पुष्पा २’चं भारतातील एकूण कलेक्शन ९०० ( जगभरात १ हजार ३२२ कोटी ) कोटींच्या घरात गेलं आहे.

हेही वाचा : “बाबा, तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली पण…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमचा आत्मा मला…”

‘पुष्पा २’ने ( Pushpa 2 ) तेलुगू इंडस्ट्रीत २७९.३५ कोटी, हिंदी भाषेत ५५३.१ कोटी, तामिळ भाषेत ४८.१ कोटी, कन्नड भाषेत ६.५५ कोटी आणि मल्ल्याळममध्ये १३.४ कोटी कमावले आहेत. ‘पुष्पा २’ने ही विक्रमी कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF चाप्टर २’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. KGF २ चे भारतातील लाइफटाईम कलेक्शन ८५९.७ कोटी इतकं होतं. आता भविष्यात ‘पुष्पा २’ सिनेमा बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader