Pushpa 2 Worldwide Box Office Collection Day 26: तीन वर्षांपूर्वी आलेल्या पुष्पा: द राइजचा ॲक्शन-पॅक सिक्वेल पुष्पा 2: द रुल ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चौथ्या आठवड्यातही सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर जलवा आहे. चौथ्या सोमवारी (डिसेंबर ३०) कलेक्शनमध्ये आधीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, २६ व्या दिवशी चित्रपटाने एकूण ६.६५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. ही त्याची आजपर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. या चित्रपटाचे सर्व भाषांमधील देशभरातील एकूण कलेक्शन ११६३.६५ कोटी रुपये झाले आहे.

पुष्पा 2 ने देशभरात जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने तेलुगू भाषेत नवीन विक्रम रचला आहे. पण हिंदीने मूळ तेलुगू भाषेपेक्षा जास्त कमाई केली. २६ दिवसांत या चित्रपटाने तेलुगू भाषेत ३२६.३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर त्याच्या हिंदीत तब्बल ७५८.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Manoj Jarange Patil Maharashtra Assembly Election 2024
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून काल मतदारसंघांची घोषणा, आज निवडणुकीतून माघार, आंतरवालीत रात्री काय घडलं?
Suresh Dhas Statement on Prajkata Mali
Suresh Dhas Vs Prajakta Mali : “प्राजक्ताताई माळींसह मी सर्व स्त्रियांचा आदर करतो, त्यांची मनं दुखावली..”, सुरेश धस यांची अखेर दिलगिरी
brad pitt anjelina jolly divorce
हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याचा ८ वर्षांनी झाला घटस्फोट; अभिनेत्रींच्या वकिलांनी दिली माहिती म्हणाले, “तिने आणि तिच्या मुलांनी…”

हेही वाचा – झणझणीत ठेचा अन्…; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतोय ‘हा’ मराठी तडका असलेला पदार्थ, किंमत किती? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

पुष्पा 2 जगभरातील कमाई किती?

तेलुगू आणि हिंदीशिवाय पुष्पा 2 ने इतर भाषांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाने तामिळमध्ये ५६.९५ कोटी रुपये, मल्याळममध्ये १४.१२ कोटी रुपये आणि कन्नडमध्ये ७.६२ कोटी रुपये कमावले आहेत. या आकडेवारीवरून प्रादेशिक चित्रपटांची इतर राज्यांमध्ये वाढत असलेली लोकप्रियता दिसून येत आहे. मैथ्री मूव्ही मेकर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाने जगभरात १७६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वनवास’, ‘बेबी जॉन’, ‘मुफासा: द लायन किंग’सह इतर चित्रपटांना मागे टाकलं.

हेही वाचा – “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

पुष्पा 2: द रुल हा २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहे. या चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने अल्लु अर्जून वादात अडकला. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. मृत महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून रुग्णालयात दाखल आहे. त्याचा खर्च अल्लू अर्जुनचे कुटुंबीय व चित्रपटाच्या निर्मात्यांनी उचलला आहे.

Story img Loader