दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला आणि अल्लू अर्जुन फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्येच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाच्या संवादांची प्रेक्षकांना एवढी भूरळ घातली होती की आजही अनेकांच्या तोंडी हे संवाद ऐकायला मिळातात. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला तर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता हिंदी चित्रपटात काम करण्याबाबत अल्लु अर्जुननं प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेलं यश पाहता दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी चित्रपटसृष्टी असा वाद सुरू असल्याचं चित्र मागच्या काही काळापासून पाहायला मिळात आहे. अशात आता हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत महेश बाबूनंतर दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”

अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत, “कधी संधी मिळाल्यास हिंदी चित्रपटांमध्ये काम करशील का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला, “हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास मी उत्सुक तर आहे मात्र हिंदीमध्ये अभिनय करणं माझ्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्यासारखं आहे. पण जर याची गरज पडली तर मी त्यासाठी पूर्ण मेहनत करण्यास तयार आहे.” अल्लू अर्जुनची ही प्रतिक्रिया सध्या बरीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये काम करायचं झाल्यास अल्लू अर्जुनचं मुंबईमध्ये देखील घर आहे.

आणखी वाचा- “एवढा गर्व कोणत्या गोष्टीचा…” अल्लू अर्जुनचं वागणं पाहून भडकले लोक

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘पुष्पा: द राइज’मध्ये दिसला होता. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट मल्याळम, हिंदी, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. लवकरच अल्लू अर्जुन ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader