‘पुष्पा’ चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन १६ दिवसांनंतर दुबई दौरा संपवून भारतात परतला. पण घरी पोहोचल्यावर त्याच्या लेकीनं ज्याप्रकारे स्वागत केलं ते पाहून तो भारावून गेला. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ सुपरहीट ठरल्यानंतर त्याच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे. अशात आता त्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. ज्यात त्यानं त्याच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत.
अल्लू अर्जुन सध्या त्याला चाहत्यांकडून जे प्रेम मिळत आहे त्यामुळे खूप खूश आहे. पण घरी परतल्यानंतर त्याच्या मुलीनं त्याचं ज्याप्रकारचं स्वागत केलं त्यानं सर्वांचीच मनं जिंकली. अल्लू अर्जुननं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अल्लू अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी असून या दोघांना अरहा आणि अयान ही दोन मुलं आहेत. अल्लू अर्जुन नेहमीच त्याच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.
अल्लू अर्जुननं नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनची मुलगी अरहा दिसत आहे. तिनं फुलांचा वापर करुन जमिनीवर ‘वेलकम नाना’ असा खास संदेश बाबा अल्लू अर्जुनसाठी लिहिला आहे. या फोटोमध्ये अरहा देखील दिसत आहे. अरहाचा हा फोटो शेअर करताना अल्लू अर्जुननं लिहिलं, ‘परदेशात १६ दिवस राहून घरी आल्यानंतर एवढं गोड स्वागत’ अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनची मुलगी अरहा एक बालकलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. तिनं काही दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुननं अरहासोबत त्याचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात दोघंही खळखळून हसताना दिसत होते. त्याचा हा फोटो देखील सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.