दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’ या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांवर अनेक रील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अल्लू अर्जुनचे भारतात लाखो चाहते आहेत. पण त्याची लोकप्रियता ही फक्त भारतीयां पर्यंत राहिली असं नाही. तर परदेशातही पुष्पा या त्याच्या भूमिकेने आणि चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याचं इंग्लिश व्हर्जन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
एम्मा हेस्टर्स ही लोकप्रिय डच गायिका आहे. एम्माने नुकतचं ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणं गात एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला २ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण आता पर्यंत अनेक परदेशातील लोकांनी ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले. पण पहिल्यांदा परदेशातील एका चाहतीने हे गाणं गायलं आहे. एम्मा ही एक युट्यूबर आहे. ती तिच्या युट्यूब चॅनेलवर असेच अनेक कव्हर सॉंग्स गाताना दिसते.
आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक
दरम्यान, ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाण्यांवर आधी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर त्यानंतर विराट कोहलीचा क्रिकेटच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘पुष्पा’ या चित्रपटाने सगळ्यांच वेड लावलं असं म्हणायला हरकत नाही. ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली आहे.