दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझर आणि पहिल्या गाण्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे सतत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाविषयी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशातच ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनच्या फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका ढाब्यात जेवताना दिसत आहे. एकाबाजूला अल्लू अर्जुन फोन बोलताना पाहायला मिळत असून दुसऱ्याबाजूला त्याची पत्नी स्नेहा खाताना दिसत आहे. या फोटोमधील दोघांच्या साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकली आहे.
हेही वाचा – दुसऱ्यांदा होणार अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा, ठिकाणही ठरलं; वाचा पाहुण्यांची यादी
हेही वाचा – “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के…”, पुतणी १२ वी पास झाल्यावर संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणाला…
अल्लू अर्जुनचा हा साधेपणा पहिल्यांदा दिसत नसून अनेकदा पाहायला मिळाला आहे. यापूर्वी अभिनेता एका छोट्या दुकानात डोसा खाताना दिसला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. डोसा खाल्यानंतर दुकान मालकाला १००० रुपये अभिनेत्याने दिले होते. पण मालकाने अर्जुनकडून पैसे घेण्यास नकार दिला.
हेही वाचा – ‘तुजवीण सख्या रे’नंतर गौरव घाटणेकर ‘या’ नव्या मालिकेत झळकणार प्रमुख भूमिकेत, पत्नीची आहे निर्मिती
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना व फहाद फाजिल पुन्हा पाहायला मिळणार आहेत. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटावर एकूण खर्च ५०० कोटी रुपये झाल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. शिवाय नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे.