दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच महिने झाले असले तरी अल्लू अर्जुनची क्रेझ अजूनही कायम आहे. आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडणाऱ्या आणि यशाच्या शिखरावर पोहचलेल्या अल्लू अर्जुनवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा वाढदिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने त्याने सहकुटुंब सुवर्ण मंदिराला भेट दिली. पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये हे प्रसिद्ध देवस्थान आहे. अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा आणि मुलांसह सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाला. यावेळी अल्लू अर्जुनने निळ्या रंगाचा कुर्ता तर त्याच्या पत्नीने ड्रेस परिधान करून पारंपारिक पेहराव केला होता. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना घरात चोरीचा प्रयत्न, चोराने भिंतीवरून उडी मारली अन्…

हेही वाचा >> ‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार

अल्लू अर्जुनने २०११ मध्ये स्नेहा रेड्डीशी लग्नगाठ बांधली. त्यांना अयान नावाचा मुलगा आणि आर्हा ही मुलगी आहे. अल्लू अर्जुनने पत्नीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

हेही पाहा >> Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”

‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अल्लू अर्जुन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाइलने वेड लावलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ‘पुष्पा २’ चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader