ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचे भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचेही त्याला वेड आहे. तो सतत या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता वॉर्नरने सध्या चर्चेत असणारा चित्रपट ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनने कमेंट केली आहे.
डेविड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीवल्ली या गाण्यावर अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, त्याने ब्लॅक अॅण्ड व्हाइट शर्ट परिधान केला असून काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. हा व्हिडीओ शेअर त्याने, ‘पुष्पा… what’s next??’ असे कॅप्शन दिले आहे.
Video: अल्लू अर्जुन स्वत:च्याच हिंदी आवाजावर झाला फिदा; श्रेयस तळपदेचं कौतुक करत म्हणाला…
सध्या सोशल मीडियावर डेविड वॉर्नरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. स्वत: अल्लू अर्जुनने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये आगीचे आणि हसण्याचे इमोजी वापरले आहेत.
यापूर्वी क्रिकेटर रवींद्र जडेजाने अल्लू अर्जुनसारखा लूक करत फोटो शेअर केला होता. त्याचा हा फोटो पाहून अल्लू अर्जुनने कमेंट केली होती. जडेजाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.