दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. फक्त इतकच नाही तर या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली. तर समांथा रूथ प्रभू हिच्यावर चित्रित झालेल्या ‘ऊ अंटावा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाच्या पुढील भागातही या गाण्याचं नवीन व्हर्जन ऐकायला मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहाते उत्सुक होते. तर आता या चित्रपटाच्या संगीतकारानेच या गाण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ची चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल ची माहिती जाणून घेण्यासाठी याचे चाहते खूप उत्सुक आहेत. ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम या चित्रपटाबद्दल अपडेट्स देत आहे. नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनची देखील झलक दिसली. तर त्या पाठोपाठ आता ‘ऊ अंटावा’ या गाण्याबद्दल संगीतकारांनी एक सिक्रेट उघड केलं आहे.

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

‘पुष्पा’ चित्रपटाचे संगीतकार डीएसपी सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनामध्ये व्यग्र आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “‘पुष्पा २’ची काही गाणी आधीच तयार झाली आहेत. पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे गाणं खूप गाजलं. तर या गाण्याचं रीप्राइज व्हर्जन ‘पुष्पा २’मध्ये पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली होती. पण ‘पुष्पा २’साठी आम्ही ‘ऊ अंटावा’च्या रीप्राइज व्हर्जनचा विचार करत नाहीयोत. त्यामुळे त्याबद्दल इतक्या लवकर बोलणं घाईचं ठरेल.”

हेही वाचा : “मी कधीही…”; नागाचैतन्यच्या डेटिंगबद्दल दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेबाबत समांथा रुथ प्रभूचा मोठा खुलासा

दरम्यान, ‘पुष्पा २’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षाही ग्रँड असणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या उत्कंठावर्धक टीझरनंतर प्रेक्षकांच्या मनातली चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट २०२३ च्या शेवटी किंवा २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa film music director revealed their music plan of pushpa 2 rnv