दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. दोन दिवसांपूर्वी पुष्पाची एक झलक दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा एक जबरदस्त रौद्र रूप समोर आलं आहे. हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा हा अत्यंत रौद्र अवतारात आपल्या बघायला मिळत आहे. त्याच्या गळ्यात वेगवेगळे दागिने, हारतुरे तसेच लिंबाची माळ बघायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांना ‘कांतारा’ची आठवण झाली. त्यातही रिषभ शेट्टीचा असाच लूक पाहायला मिळाला होता. ‘लल्लनटॉप’च्या वृत्तानुसार अल्लू अर्जुनच्या या लूकचं एका धार्मिक परंपरेशी असल्याचं म्हंटलं जात आहे. काही नेटकऱ्यांनी हा लूक ‘गंगम्मा यात्रे’पासून प्रेरित असल्याचा दावा केला आहे.

आणखी वाचा : “मी मुंबई सोडली…” आशिष विद्यार्थी यांनी सांगितलं बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळण्यामागील कारण

काय आहे ही ‘गंगम्मा यात्रा’?

गंगम्मा यात्रा हे एक लोककला उत्सव आहे. हा उत्सव कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्यात ७ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, आणि या ७ पैकी मधले २ दिवस एका यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेत पुरुष वेष बदलून महिलांसारखे दाग दागिने आणि कपडे परिधान करून, नटून सजून या यात्रेत सहभागी होतात. ‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनही अशाच यात्रेत सहभागी झाल्याचं दाखवण्यात येणार असल्याचा दावा लोकांनी हा फर्स्ट लूक पाहून केला आहे.

आणखी वाचा : अल्लू अर्जुनचं ‘पुष्पा २’मधील रौद्ररूप पाहिलंत? फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांना आठवला ‘कांतारा’

अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांनी यावर भरभरून कॉमेंट केल्या आहेत. अल्लू अर्जुनला शुभेच्छा देत त्याच्या या लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे. एकंदरच पुष्पाचा हा लूक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढली आहे. ‘पुष्पा २’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.