अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द रुल’ला मोठं करण्यासाठी त्याचे निर्माते जमतील ते हातखंडे वापरत आहेत. चित्रपटाचे शूटिंग नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करायचे निर्मात्यांनी ठरवले होते, त्यानुसारच तारीखही पक्की करण्यात आली होती . एकतर अशा परिस्थितीत निर्माते ‘सालार’ची रणनीती अवलंबतील. म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे प्रमोशन करतील अन्यथा त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल.

लवकरच ‘पुष्पा द रूल’चे निर्माते याबाबतीतील निर्णय जाहीर करतील. चित्रपटाच्या कहाणीबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. ‘सिनेजोश’ वेबसाइटच्या माहितीनुसार ‘पुष्पा द रूल’मध्ये अल्लू अर्जुनचे पात्र एका जपानी तस्कराशी दोन हात करताना पाहायला मिळणार आहे.त्याच्याशी संवाद करता यावा यासाठी अल्लू अर्जुन जपानी भाषेचा वापर करणार आहे. याचाच अर्थ अल्लू अर्जुन चित्रपटात जपानी भाषेत बोलताना दिसणार आहे.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Palak Sindhwani Legal Battle Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers
“बदनाम करण्यासाठी…”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीचे मानसिक छळाचे आरोप, मालिका सोडण्याचा निर्णय
Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
tumbaad rahil anil barve
पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, पण दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणार नाही राही अनिल बर्वे; स्वतः सांगितलं कारण
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
stock market Nifty Nifty Index investment
बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?

आणखी वाचा : हृतिक-दीपिकाचा ‘फायटर’ लवकरच पार करणार १०० कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

‘पुष्पा २’ काही कारणास्तव सतत लांबणीवरच पडत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये अभिनेता जगदिश यांना पोलिसांनी अटक केली होती. जगदिशने चित्रपटात ‘पुष्पा’च्या मित्राची भूमिका निभावली होती. एका ज्युनिअर आर्टिस्टला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप जगदीशवर करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि जगदीश हा सध्या जामीनावर बाहेर सुटला आहे.

लवकरच आता ‘पुष्पा २’चं उर्वरित चित्रीकरण तो पार पाडणार आहे. एकूणच ‘पुष्पा द रूल’चं पोस्टपोन होणं अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’साठी फायद्याचं ठरणार आहे. रोहित शेट्टीनेही त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ची तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही नक्की केली आहे. त्यामुळे जर ‘पुष्पा द रूल’ पुढे ढकलला गेला तर ‘सिंघम अगेन’साठी ही फार उत्तम संधी असू शकते. अद्याप निर्मात्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नसून लवकरच याबाबतीत ते घोषणा करतील.