गेले काही दिवस बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहेत. याबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांनीही प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं आहे. गेल्या काही महिन्यात ‘जेलर’, ‘गदर २’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘ओह माय गॉड २’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’सारख्या कित्येक चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली.

सिंगल स्क्रीन थेटर्सबरोबर मल्टीप्लेक्सबाहेरसुद्धा हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला होता. तरी चित्रपट पाहायचा म्हंटलं की खिशाला १००० रुपयांचा फटका अगदी सहज बसतो. हीच परिस्थिटी लक्षात घेता ‘PVR multiplex’ चेन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसारखा सबस्क्रिप्शन प्लॅन आणायच्या विचारात आहे.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?

आणखी वाचा : OTT वरील बोल्ड कंटेंट पाहून दिग्दर्शक मणीरत्नम यांची पत्नी निराश; बॉलिवूडमधील अभिनेत्यांना धरलं जवाबदार

‘मनी कंट्रोल’च्या वृत्तानुसार’ या प्लॅनमध्ये चित्रपट रसिकांना ६९९ रुपयांमध्ये महिन्याला १० चित्रपट पाहायला मिळणार आहेत. या हिशोबाने प्रेक्षकांना एक चित्रपट केवळ ७० रुपयांत पाहायला मिळणार आहे. असं म्हंटलं जातंय की हे भारतातील पहिलं थेटर सबस्क्रिप्शन मॉडेल असेल. इतकंच नव्हे तर हा प्लॅन फक्त सोमवार ते शुक्रवार याच दिवसांसाठी लागू असेल.

आणखी वाचा : ‘डंकी’ पोस्टपोन होणार नाही; डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर आमने सामने येणार किंग खान व प्रभास

या प्लॅन अंतर्गत दिवसाला एकच तिकीट मिळणार असून समोरच्या व्यक्तीला सरकारी ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. ‘PVR’च्या मालकांच्या प्लॅन ज्येष्ठ मंडळी व गृहिणी यांना चांगलाच फायदेशीर ठरू शकतो. ३५ ते ४० या वयोगटातील लोकांना चित्रपटगृहांकडे वळवण्याचा चित्रपटगृहांच्या मालकांचा हेतु आहे. एकूणच ‘PVR’चा हा सबस्क्रिप्शन प्लॅन नेमका किती फायदेशीर ठरतो ते येणाऱ्या काळात समजेलच.

Story img Loader