रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये दीपिका पदुकोणने भलेही शाहरूखबरोबर चौकडय़ांची लुंगी आणि शर्ट घालून टेचात छायाचित्रे दिली आहेत. पण, संजय लीला भन्साळीच्या ‘राम लीला’ या चित्रपटाच्या सेटवर मात्र याच लुंगीवरून रणवीर सिंग आणि दीपिकामध्ये भांडण लागले. भन्साळीने ‘सावरिया’ या चित्रपटात रणबीर कपूरला टॉवेल नेसून संपूर्ण एक गाणे सावरिया सावरिया करत नाचायला लावले होते. आता ‘राम लीला’मध्ये रणवीर सिंगलाही तशाच प्रकारे काहीतरी हटके करायला लावावे, या विचाराने भन्साळीने त्याला लुंगी दिली. पण, रणवीर सिंगची सध्याची तथाकथित प्रेयसी दीपिकाला मात्र त्याने लुंगी घालून नाचावे ही कल्पना पटली नाही आणि तिने तिथल्यातिथेच फटकळपणे हे सांगूनही टाकले. बरे आपल्याला नाही आवडले एवढेच सांगून थांबायचे तर तेही नाही. तिने हा प्रकार जॉन अब्राहमच्या ‘दोस्ताना’शी जोडत रणवीर सिंगला सवंग प्रसिध्दीसाठी काहीही करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत टाकल्यामुळे लुंगी प्रकरण जरा जास्तच पेटले आहे.
 या दोघांमध्ये फुलत असलेल्या प्रेमसंबंधांचीही चर्चा सुरू आहे. या सगळ्याचा फायदा घेत रणवीरला हिरो म्हणून प्रमोट करण्यासाठी काहीतरी हटके, बोल्ड दृश्य करायला लावावे म्हणून भन्साळीने लुंगीची कल्पना त्याला सांगितली. लुंगी घालून बोल्ड दृश्य देण्याची कल्पना त्याने रणवीरच्या गळीही उतरवली. ही कल्पना ऐकल्यावर दीपिकाने मात्र ‘आता माझी सटकली..’ असा काहीसा अवतार धारण केला आणि भन्साळीऐवजी रणवीरला धारेवर धरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quarrel between ranvir singh and deepika padukone