छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांनी हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनयाने चार चांद लावले. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह या आजारी होत्या. वयाच्या ५० वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निशी सिंह यांचे पती, लेखक आणि अभिनेते संजय सिंह भादली यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशी यांना मे महिन्यात पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालवत गेली. यानंतर त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांना घशाचा गंभीर संसर्ग झाला. यामुळे त्यांना काहीही खाता येत नव्हते. त्या फक्त द्रवपदार्थ खाऊ शकत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे १६ सप्टेंबरला निशी सिंह यांनी त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांना काहीही बोलता येत नव्हते. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यावेळी त्यांचे पती संजय सिंह यांनी निशी यांची शेवटची इच्छाही पूर्ण केली होती. त्यांना वाढदिवसाच्या दिवशी बेसनचा लाडू खाण्याची प्रचंड इच्छा झाली होती. त्यांनी तो लाडूही खाल्ला, असे संजय यांनी सांगितले.

निशी सिंह या गेल्या कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांनी हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांसोबत चित्रपटातही काम केले आहे. ‘कुबूल है’ या मालिकेत निशी सिंह यांनी हसिना बीवीची भूमिका साकारली होती. तसेच मान्सून वेडिंग या चित्रपटातही निशी सिंह यांनी काम केले होते. निशी यांनी कमल हसन आणि मामूटी यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली होती. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजय सिंह भादली आणि दोन मुलं असा परिवार आहे.