मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात ६०व्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी आपल्या उपस्थितीने या सोहळ्यास खास बनवले. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील २०१४ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘क्विन’ चित्रपटासाठी कंगना राणावतला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित नसलेल्या अभिनेत्री कंगना राणावतला स्वत: बॉलिवूड ‘दिवा’ रेखाने कंगनाच्या घरी जाऊन तिला पुरस्कार दिला. आश्चर्य म्हणजे रेखा पहाटे जवळजवळ ३ वाजता पुरस्काराची ट्रॉफी आणि फूल घेऊन कंगनाच्या घरी पोहोचली. ज्येष्ठ अभिनेत्री रेखाला एवढ्या पहाटे पुरस्कारासह आपल्या घरी आलेली पाहून कंगनाला सुखद धक्का बसला. या घटनेविषयी बोलताना ती म्हणाली, ते सर्व खूपच छान होते, माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुखद क्षण होता, कोणत्याही पुरस्कारापेक्षा, कुठल्याही प्रकारच्या कौतुकापेक्षा तो क्षण खास होता. जेव्हा रेखा माझ्या घरी आल्या होत्या तेव्हा मी मित्रांबरोबर होते, त्यांना दरवाजात पाहून मी आश्चर्यचकीत झाले, तो क्षण फार प्रभावी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा