भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती भाषेतील चित्रपटाची निवड चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.  ‘द काश्मीर फाईल्स’ व ‘आरआरआर’ अशा सुपरहीट चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट आता ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये पाठवण्यात आल्यानंतर अभिनेता आर. माधवनने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ‘छेल्लो शो’ला ऑस्करसाठी पाठवताना इतर चित्रपटांचा विचारही व्हायला हवा होता, असंही मत त्याने व्यक्त केलं.

इंडिया टुडेशी बोलताना आर माधवन आणि त्याचा सह-कलाकार दर्शन कुमार मिश्किलपणे म्हणाले, ‘रॉकेट्री व द काश्मीर फाइल्सचाही ऑस्करला पाठवण्यासाठी विचार करायला पाहिजे.’ माधवन म्हणाला, ‘मला वाटतं की त्यांनी रॉकेट्री आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपटही ऑस्करसाठी पाठवायला हवेत.’ नंतर ते दोघंही एकमेकांच्या चित्रपटांबद्दल बोलतात. रॉकेट्रीला ऑस्करसाठी पाठवण्यात यावं, याबद्दल आपण मोहिम सुरू करणार असल्याचं दर्शन म्हणतो. तर, काश्मीर फाइल्सला पाठवण्यासाठी आपण मोहीम सुरू करत असल्याचं माधवन म्हणतो. शेवटी माधवन म्हणाला, “त्यांना (छेल्लो शो चित्रपटाला) शुभेच्छा. मला आशा आहे की ते जातील आणि जिंकतील, ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल.”

ऑस्करमध्ये गेलेल्या ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या कथा, विषय, रिलीज डेट अन् बरंच काही!

याच दरम्यान, आर माधवन भारतातही ऑस्करच्या समतुल्य पुरस्कार असावा, याबद्दल बोलला. तो म्हणाला, “मला आशा आहे की भारतात ऑस्करच्या बरोबरीचा किंवा त्यापेक्षा चांगला प्लॅटफॉर्म असेल. आम्ही तिथे (ऑस्करमध्ये) काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत, या गोष्टी खूप झाल्यात.” यावर अपारशक्ती खुराना म्हणाला, ‘आम्हाला एका legit award show ची गरज आहे. त्यापैकी एक नावही समोर आले आहे आणि त्याला क्रिटिक्स चॉईस-समथिंग अवॉर्ड, असं म्हटलं जातं.’

ऑस्करच्या क्रेझबद्दल आर माधवन म्हणाला, “मेंटल असणं ही चांगली गोष्ट असेल. पण ती वेगळी बाब आहे. ऑस्करमध्ये फरक एवढाच आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये ज्याला हा पुरस्कार मिळतो, त्यांच्या उत्पन्नात, वेतनात आणि इंडस्ट्रीत पुढे जाण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो. आमच्याकडे भारतातही असा एक पुरस्कार असावा जिथे आम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर व्हॅल्युएशनमध्ये कायदेशीर वाढ होईल.”

Story img Loader