विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात आता प्रसिद्ध अभिनेता आर माधवनची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता आर माधवनचं या चित्रपटाबाबतचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर आर माधवननं आपल्या ट्वीटमध्ये या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये आर माधवननं लिहिलं, ‘हे खूपच अविश्वसनीय आणि अद्भूत आहे. त्यामुळे मला आता इर्ष्या वाटत आहे आणि सोबतच ‘द कश्मीर फाइल्स’च्या संपूर्ण टीमचा अभिमानही वाटत आहे.’ आर माधवनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे.

आणखी वाचा- वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषची पूर्वश्रमीच्या पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणाला…

दरम्यान याआधी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘झुंड’, ‘कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांवरुन वाद सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना नागराज मंजुळे म्हणाले, “एखादा चित्रपट प्रदर्शित झालाय. तो पाहा आणि मग त्यावर विचार करा. कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद सुरु आहे. या वादाला काहीही अर्थ नाही. तुमच्या जीवनात जर त्याचा काही परिणाम झाला तर चांगलचं आहे. दिग्दर्शक त्याच्या घरी असणार आहे. पण तुम्ही चित्रपटगृहाबाहेर अशी हाणामारी करणे योग्य नाही.”

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर हृतिक रोशनच्या आईची कमेंट, म्हणाल्या…

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली होती.