अभिनेता आर माधवन मुख्य भूमिकेत असणारी ‘डीकपल्स’ ही सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर या सीरिजमधील एक सीनचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आर माधवन दिल्ली विमानतळावर दिसत आहे.
आर माधवन आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘डीकपल्स’ या सीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सीरिजमध्ये आर माधवन आर्य अय्यरच्या भूमिकेत दिसत आहे. आर्य एक लेखक असून त्याला पाठदुखीचा त्रास असतो. त्यामुळे नेहमी व्यायाम करण्यासाठी तो मोकळी जागा शोधत असतो. दिल्ली विमानतळावर देखील जागा शोधत असताना तो प्रार्थना कक्षेत पोहोचतो. त्यावेळी तेथे एक व्यक्ती नमाज पठण करत असल्याचे दिसते.
आणखी वाचा : करीना कपूर खानचा लेक तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीचा पगार माहितीये का?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की आर्य नमाज पठाण करत असलेल्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन व्यायाम करु लागतो. त्या व्यक्तीला प्रचंड राग येतो आणि हे प्रार्थना कक्ष आहे. येथे व्यायाम करु शकत नाही असे म्हणतो. आर्य त्याला पाठदुखीचा त्रास असल्याचे समजावतो पण ती व्यक्ती ऐकत नाही.
शेवटी ती व्यक्ती आर्यची तक्रार विमानतळावरील कर्माचाऱ्यांकडे करते. ही खोली प्रार्थना करण्यासाठी आहे असे तो कर्मचारी आर्यला समाजवतो. तेवढ्यात आर्य गायत्री मंत्राचा जप सुरु करतो. ते पाहून ती व्यक्ती प्रचंड चिडते पण त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. सध्या हा सीरिजमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत आहे.