बॉलिवूड अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आर माधवर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. फक्त आर माधवनच नेहमी चर्चेत नसतो तर त्याचा मुलगा देखील नेहमीच चर्चेत असतो. पण त्याचा मुलगा हा अभिनयामुळे तर एक जलतरणपटू म्हणून ओळखला जातो. वेदांत असे आर माधवनच्या मुलाचे नाव आहे. कोपेनहेगनमध्ये डेन्मार्क ओपनमध्ये आधी रौप्य पदक मिळवलं तर आता सुवर्ण पदक मिळवत देशाची मान उंचावली.
वेदांतचा एक व्हिडीओ आर माधवनने शेअर केला आहे. आर माधवनने शेअर केलेल्या या व्हिडीओत वेदांच सुवर्ण पदक घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने विजयाची घोडदौड सुरुच आहे. आज वेदांतने ८०० मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. कोच प्रदीप सरांचे आभार. स्विमिंग फेडरेशनच्या संपूर्ण टीमचे आभार, ” असे कॅप्शन आर माधवनने दिले आहे.
आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्न बंधनात?
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार
आणखी वाचा : Optical Illusion : चित्रातील व्यक्ती कोणत्या दिशेने धावते, जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व
वेदांतने जलतरणात पदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, वेदांतने बेंगळुरू येथे झालेल्या ४७व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके पटकावली होती. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते आणि त्याच्या कामगिरीमुळेच लोकांनी माधवनच्या मुलाची तुलना अनेक स्टार किड्सशी करायला सुरुवात केली आणि म्हटले की हा फरक आहे.