बॉलिवूड अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आर माधवन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आर माधवनने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं वेळात वेळ काढून उत्तर देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्यात आता सुद्धा त्याने त्याच्या चाहत्यांच्या काही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, एका चाहत्याच्या मेसेजवर आर माधवनने मजेशीर उत्तर दिले आहे.
आर माधवनने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. यावेळी एका चाहतीने “यांना पाहून आता यांना डॅडी बोलण्याची वेळ आली असे वाटते. चाहतीच्या या ट्वीटवर उत्तर देत आर माधवन म्हणाला, बेटा काका बोल, तुझ्या वडिलांच्या भावना मला दुखवायच्या नाहीत आणि त्यासोबत त्याने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
आर माधवनची डीकपल्ड ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. तर आर माधवनचा आता ‘रेल्वे मॅन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९८४ साली झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटा केके मेनन, दिव्येंदू शर्मा आणि इफरान खान यांचा मुलगा बाबिल खान दिसणार आहे.