‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले. या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार पडला आहे. आता माध्यमांच्या वृत्तानुसार ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहेत. आतापर्यंत १००८ तिकिटं विकली गेली आहेत असं बोललं जात आहे. ‘रॉकेटरी’ चित्रपटाने पुन्हा चर्चेत आला अभिनेता दिग्दर्शक आर माधवनचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘धोखा राऊंड द कॉर्नर’ या त्याच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही.

हा चित्रपट ज्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला त्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिना निमित्त तिकिटांची किंमत ७५ रुपये निश्चित करण्यात आली होती. स्वस्त दरातही हा चित्रपट पाच कोटींची कमाई करू शकला नाही. या चित्रपटाची कमाई रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि सनी देओलच्या ‘चूप’ या चित्रपटांच्या तुलनेत कमी झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२५ कोटींची कमाई केली आहे.

नातेसंबंध टिकून राहावे यासाठी बोमन इराणींनी दिला सल्ला, म्हणाले “आजचं भांडण उद्या…”

‘चीटिंग राऊंड डी कॉर्नर’ची कथा शहरी जोडप्याच्या दिवसाभोवती फिरताना दिसणार आहे. आर माधवनच्या या चित्रपटात तुम्हाला एकामागून एक असे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतील, जे प्रत्येक क्षणाला चकित करतील. कथेला योग्य असे नाव चित्रपटाला दिले आहे. एका क्षणात पती-पत्नीमध्ये प्रेम पाहायला मिळेल, तर दुसऱ्या क्षणी पत्नी पतीला गोळ्या घालण्यास सांगेल. एकूणच ही कथा सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे.

आर. माधवनच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंडींगवर असल्याचे पाहायला मिळाला होता. आर माधवन अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच मात्र आता तो उत्तम दिग्दर्शकदेखील आहे हे त्याने पटवून दिलं आहे. आर माधवन प्रमाणे त्याचा मुलगा देखील चर्चेत असतो.

Story img Loader