शाहिद आणि इलयाना डिक्रुझ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. काही वर्षांच्या आरामानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर आलेला शाहिद या चित्रपटातून त्याची फारशी जादू प्रेक्षकांवर चालवू शकला नाही. पण, आता प्रभू देवा दिग्दर्शित ‘आर.राजकुमार’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सोनाक्षी-शाहिदची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. सोनाक्षी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत असताना आता शाहिदसोबतची तिची जोडी पुन्हा तीच कमाल दाखवू शकेल का, ते ‘आर.राजकुमार’ प्रदर्शित झाल्यावरच कळेल. तोपर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर पाहावा लागणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद रावडी अंदाजात दिसतो. छोटी साइज की चीज ही बडा काम करती है, अशा रावडी शाहीदचे सोनाक्षीसोबत रोमान्स करताना एका प्रेमीचे रुप पाहायला मिळते. सोनू सूद चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभू देवाचे दिग्दर्शन असल्यामुळे चित्रपटात तुफान नृत्य असलेला ‘आर. राजकुमार’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
पहाः आर.राजकुमार चित्रपटाचा ट्रेलर