अभिनेत्री आणि गायिका रागेश्वरीने लंडनस्थित व्यावसायिक सुधांशू स्वरूपशी २७ जानेवारी रोजी लग्न केले. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी निता लुल्लाने डिझाईन केलेली साडी रागेश्वरीने परिधान केली होती. या साडीत रागेश्वरी खचितच सुंदर दिसत होती. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर रागेश्वरी लंडनला स्थायिक होणार असल्याचे समजते.  बॉलिवूडमधील कबीर बेदी, अफताब आणि त्याची गर्लफ्रेण्ड निन, पुनीत इस्सार, पुजा बेदी आणि मधू इत्यादी या लग्नसोहळ्याला उपस्थिती होते.

Story img Loader