अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या प्राजक्ता ‘रानबाजार’ या तिच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ता बोल्ड भूमिकेत दिसली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. आता प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिच्या करिअरमधल्या बेस्ट सीन्स विषयी सांगितले आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताचा रानबाजार सीरिजमधील रत्ना या तिच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. “आणि जो सीन माझ्या कारर्किदीतला सगळ्यात बेस्ट सीनपैकी एक आहे. (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो सीन असलेला एपिसोड काल प्रदर्शित झाला… वन टेक वन शॉट”, असे कॅप्शन प्राजक्ताने त्या पोस्टला दिले.
आणखी वाचा : “जॉनी डेपला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही…”, अँबर हर्डच्या वकिलाचे वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेणारा अक्षय एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो माहितये का?
दरम्यान, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत. अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन यांनी केली आहे.