जेव्हापासून अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ची घोषणा झालीये, तेव्हापासूनच या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होतेय. त्यात तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर तर या चर्चांना अधिकच उधाण आले. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित ?!’ ही टॅगलाईनच बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे ‘रानबाजार’च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. ‘रानबाजार’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेबसीरीजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत.

आजवर वेबविश्वात कधीही न पाहिलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वेबसीरिज आहे. आजवरची भारतातील ही सर्वोत्तम सीरिज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ‘रानबाजार’च्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबलाय, जो आपल्याला पुढील भाग पाहण्यास प्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक क्षणी आपली उत्कंठा वाढवणारी ही वेबसीरिज आहे. पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचे दिसत आहे. ही हत्या कोणी केली? हा हनी ट्रॅप आहे की, या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे? रत्ना (प्राजक्ता माळी) आयेशाला का आसरा देते? चारुदत्त मोकाशी ( अभिजित पानसे) या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का? मुख्यमंत्रीपदी कोण येणार? सत्तापालट होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पुढील दोन भागांत होणार आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

आणखी वाचा- व्हायरल इंटीमेट फोटो ते विवाहित अभिनेत्याशी अफेअर, वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिली नयनतारा

त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती अखेरच्या दोन भागांची. मुख्यमंत्री सतीश नाईक ( मोहन आगाशे), सयाजी पाटील ( मोहन जोशी), पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्प्पा (मकरंद अनासपुरे), निशा (उर्मिला कोठारे), युसूफ पटेल ( सचिन खेडेकर), इन्स्पेक्टर पालांडे (वैभव मांगले), रावसाहेब यादव ( अनंत जोग) , प्रेरणा सयाजीराव पाटील ( माधुरी पवार) या सर्वांनीच आपापल्याभूमिका अगदी चोख पार पाडल्या आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि रावण फ्युचर प्रॉडक्शनने रानबाजार’ची निर्मिती केली आहे.