जेव्हापासून अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ची घोषणा झालीये, तेव्हापासूनच या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होतेय. त्यात तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर तर या चर्चांना अधिकच उधाण आले. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित ?!’ ही टॅगलाईनच बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे ‘रानबाजार’च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. ‘रानबाजार’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेबसीरीजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा