चित्रपट हे मनोरंजनाचं एक उत्तम माध्यम आहे. त्यातही काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवण्यात यश संपादन केलं आहे. त्यामध्ये अगदी ‘आवारा’पासूनच्या चित्रपटांचा समावेश आहे. या यादीमध्ये हल्ली- हल्लीचे काही चित्रपटही वगळता येणार नाहीत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘लगान’. चंपानेरच्या एका लहानशा खेडेगावावर या चित्रपटाचं कथानक बेतलं होतं. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी साधेभोळे गावकरी कशा प्रकारे पेटून उठतात आणि त्यांचा लढा एका अनोख्या मार्गाने जिंकतात याचं चित्रण ‘लगान’मध्ये करण्यात आलं होतं. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरने त्याच्या या चित्रपटात कलाकारांचा बराच फौजफाटा गोळा केलेला. त्यात काही परदेशी कलाकारांचाही समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यातीलच एक म्हणजे या चित्रपटातील ‘एलिझाबेथ’. ब्रिटिश ‘कॅप्टन रसेल’च्या बहिणीच्या म्हणजेच ‘एलिझाबेथ’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्रीने सर्वांचीच मनं जिंकली होती. कटकारस्थानं करुन सर्वसामान्य गावकऱ्यांना पेचात पाडणाऱ्या ब्रिटिंशांपेक्षा ती फारच वेगळी होती. अशी ही भूमिका साकारली होती प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री रचेल शेली हिने. आमिर खानने साकारलेल्या ‘भुवन’च्या प्रेमात असलेली ही ‘एलिझाबेथ’ गावकऱ्यांना क्रिकेटचा खेळ समजवून देण्यासाठी जे प्रयत्न करत होती तेसुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. या चित्रपटानंतर रॅचेल भारतीय प्रेक्षकांच्या फारशी भेटीला आली नाही. ‘द एल वर्ल्ड’मध्ये तिने साकारलेली ‘हेलेना पेबॉडी’ ही भूमिका अनेकांच्या आवडीची ठरली.

वाचा : तैमुरला आशीर्वाद देणाऱ्या तृतीयपंथीयांवर पैशांचा पाऊस


मुळच्या इंग्लंडच्या असणाऱ्या रॅशेलने ‘युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड’ येथून ड्रामा आणि इंग्रजी या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने एडिंगबर्गच्या एका थिएटर कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९४ मध्ये तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘ब्रोकन हार्ट’ नावाच्या लघुपटातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.

२०१२- १३ मध्ये ती ‘बीबीसी’च्या मेडिकल ड्रामा ‘कॅज्युअल्टी’मध्ये झळकली होती. पण, त्यानंतर मात्र तिने या सीरिजसोबतच अभिनय क्षेत्रातूनही काढता पाय घेतला. अभिनयासोबतच ती विविध लेखन क्षेत्रातही सक्रीय आहे. ‘द स्टोरी पि़डीयाने’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिने ‘गार्डियन’ आणि ‘दीवा’ मासिकासाठीही लेखन केलं होतं.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती

सध्याच्या घडीला ती लंडनमध्ये तिच्या पार्टनरसोबत राहात आहे. रॅचेल शॅलीचा पार्टनर मॅथ्यू पार्खिल टेलिव्हिजन कार्यक्रमांचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. अशी ही रॅचेल पुन्हा भारत भेटीवर येणार का आणि आली तरीही ‘लगान’च्या सहकलाकारांची भेट घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.