कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजविण्यास सुरुवात केली आहे. नात्यातील प्रेम, कटूता, कट-कारस्थान या साऱ्यांच चित्रण करणारी मालिका नवनवीन वळणं घेत आहे. साधी भोळी राधा रोज एका नव्या संकटाला सामोरी जात आहे. त्यातच आता दीपिकाने तिच्याविरुद्ध पुन्हा एक नवा डाव रचला आहे. तिच्या या डावामध्ये तिने राधाला पूर्णपणे एकट पाडण्याचा निश्चिय केला आहे.
याआधी दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राधा मोठ्या धीराने या साऱ्याला समोरी गेली होती. आता देखील दीपिका खोट्याचाच आधार घेऊन राधापासून प्रेमच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. घरच्यांचा देखील दीपिकावर विश्वास बसू लागला असून ते राधाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दीपिकाचा खरा चेहरा फक्त राधाला माहिती आहे. आणि ती बदलली नसून फक्त नाटक करत आहे हे देखील राधाला माहिती आहे. इतकेच नसून दीपिकाने प्रेमला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे कि, राधाच्या ऑफिसमध्ये जाण्यानंतर व्यवसायामध्ये फक्त नुकसान झाले आहे तिने फक्त माणसं जोडली पण व्यवसायामध्ये काहीच नफा झाला नाही.
दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला उत्तर देणारी राधा या सकंटाला कशी सामोरी जाईल ? प्रेम दिपिकाचा खरा चेहरा ओळखून राधाची मदत करेल ? राधा दुरावलेली नाती कशी जवळ करणार ? हे बघणे रंजक असणार आहे . तेव्हा बघायला विसरू नका ‘राधा प्रेम रंगी रंगली’ सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.