‘बाहुबली’ स्टार प्रभासचा राधे श्याम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बॉक्स ऑफिसवर ७९ कोटींची कमाई केली.
चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी नुकतंच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. रमेश बाला यांनी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाची कमाई सगळ्यात जास्त आहे. काल प्रदर्शित झालेला या चित्रपटाच्या कमाईत येत्या विकेंडला वाढ होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी
आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल
‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा बहुभाषिक चित्रपट असून टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. तर हा चित्रपट तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेत ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.