आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी राधिका आपटे १७ वर्षांपेक्षा जास्त काळ या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. राधिका आपटेने कोणत्याही गॉडफादरशिवाय आपल्या कौशल्याच्या जोरावर या इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आणि अनेक गोष्टींचा सामना केला. राधिका अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी खुलेपणाने बॉलिवूडचा पर्दाफाश केला आहे. न घाबरता तिने कास्टिंग काउच आणि इंडस्ट्रीतील घृणास्पद गोष्टींवर भाष्य केलं आहे. आज राधिका आपटेचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊयात बॉलिवूडमधील तिच्या काही धक्कादायक अनुभवांविषयी…

राधिका आपटेचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी वेरुळ येथे एका डॉक्टर कुटुंबात झाला. राधिकाने अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी प्राप्त केली आहे. अभ्यास करता करता तिने ८ वर्षं कथ्थकचं प्रशिक्षणही घेतलं आहे. नृत्याचं प्रशिक्षण घेत असतानाच ती नाटकांमध्येही सहभागी झाली आणि अभिनयात तिची रुची वाढू लागली. पुढे राधिकाने अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. सुरुवातीला तिने छोट्या- मोठ्या भूमिका साकारायला सुरुवात केली. तिने २००५ मध्ये ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. या चित्रपटात राधिकाची खूप छोटी भूमिका होती. त्यानंतर तिने बॅक टू बॅक चित्रपट केले. ‘शोर इन द सिटी’, ‘मांझी द माउंटमॅन’, ‘बदलापूर’, ‘पार्च्ड’ यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये ती दिसली.
आणखी वाचा- “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

राधिका आपटेने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ती कधीच कास्टिंग काउचची शिकार झाली नाही, पण तिने याचा अनुभव घेतला आहे. ती एका मुलाखतीत म्हणाली, “एकदा मला फोन आला होता आणि ती व्यक्ती म्हणाली, काही लोक बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार करत आहेत आणि तुम्ही त्यांना चित्रपटांच्या संदर्भात जाऊन भेटू शकता. पण तुम्हाला त्यांच्यासोबत एक रात्र घालवावी लागेल. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मला हसू आले, मी त्याला सांगितले की तू जा आणि त्या लोकांना सांग की नरकात जा, मला अशा लोकांसोबत काम करायचे नाही.”

याशिवाय एकदा राधिका आपटेने एका टॉक शोमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्याचा पर्दाफाश केला होता. राधिका म्हणाली होती, “मी चित्रपटाचे शूटिंग करत होते. अभिनेता त्याच्याजवळ आला आणि माझ्या पायाला गुदगुल्या करू लागला. मला त्याचा खूप राग आला आणि मी त्याच्या कानशिलात मारली. मी त्या अभिनेत्याला कधीच भेटले नव्हते किंवा ओळखत नव्हते. अशा परिस्थितीत त्याच्या या कृतीने मला राग आला.” तसेच बीबीसी डॉक्युमेंट्रीमध्ये राधिका आपटेने कास्टिंग काउचबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं, बॉलिवूडच्या डार्क सिक्रेटबद्दल बोलताना ती म्हणाली, “जे लोक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करतात त्यांना मला धीर द्यायचा आहे. आपला आवाज किती महत्त्वाचा आहे याचा विचार लोक करत नाहीत. त्याच्या आवाजाचा किती लोकांना फायदा होऊ शकतो? पण यात रिस्क असल्याने लोक काहीही बोलण्यास टाळाटाळ करतात.”

आणखी वाचा- राधिका आपटेचा व्हिडीओ चर्चेत, अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते हैराण

तसेच ३७ वर्षीय राधिका आपटे MeToo चळवळीबद्दलही मोकळेपणाने बोलली होती. ती म्हणाली होती, “इंडस्ट्रीतही सगळीकडे पॉवर गेम आहे. यातून महिलांचा लैंगिक छळ होतो. हे सर्वत्र घडतं. कदाचित त्यांच्या घरातही असं घडतं. हे केवळ महिलांच्या बाबतीच नाही तर पुरुषांच्या बाबतीतही घडतं. या विरोधात आपण सर्वांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे, तरच परिवर्तन शक्य आहे. जनजागृती करावी लागेल. एकदा मला परदेशी चित्रपटाची ऑफर आली. त्यावेळी माझ्या पाठीत खूप दुखत होते. मी लिफ्टमध्ये होते आणि एक माणूस माझ्या शेजारी आला आणि म्हणाला तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही मला कधीही तुमच्या खोलीत बोलावू शकता, मी तुम्हाला मसाज देईन. तो माणूस माझ्यापेक्षा खूप मोठा होता. मला धक्काच बसला आणि गुड नाईट म्हणाले आणि मी माझ्या खोलीत गेले. मला एवढेच सांगायचे आहे की असा अनुभव कधीही, कुठेही येऊ शकतो.”

दरम्यान राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. २०११ मध्ये दोघांची भेट झाली होती. ती सांगते की तिच्याकडे लग्नाचा एकही फोटो नाही कारण दोघेही आनंदाच्या नशेत होते आणि अशा परिस्थितीत त्यांना दोन्ही फोटो क्लिक करता आले नाहीत.

Story img Loader