काही दिवसांपासून राधिका आपटेचा व्हायरल झालेला न्यूड व्हिडिओ हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर आपले मौन सोडत राधिकाने यावर आपण अद्याप कोणतेही विधान केले नसल्याचे म्हटले आहे.
बदलापूर आणि हंटर या चित्रपटांमध्ये झळकलेल्या राधिकाने केलेले ट्विट:
Just to clarify I have not reacted or given any statement to any news outlet.
आणखी वाचा— Radhika Apte (@radhika_apte) April 30, 2015
व्हायरल झालेला राधिकाचा न्यूड व्हिडिओ हा अनुराग कश्यपच्या २० मिनिटांच्या लघुपटाचा एक भाग आहे. ई३ टॉकीजला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली की,” या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. या जगात खूप लोक आहेत, ज्यांना काही काम नाही. ते घरात बसून निरर्थक गोष्टी करत बसतात. त्यामुळे अशा गोष्टींची तक्रार करून किंवा त्यांच्याकडे लक्ष्य देऊन आपण आपला वेळ वाया घालवता कामा नये. मला हे सगळ पाहून हसू कोसळलं कारण हे खरचं खूप हास्यास्पद आहे. मला खूप कामं आहेत आणि मी माझा वेळ यात वाया घालवू इच्छित नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. “
राधिका ही अनुराग कश्यपच्या एका आंतरराष्ट्रीय लघुपटात काम करत आहे. हा लघुपट प्रदर्शित होण्याआधीच त्यातील राधिकाचे एक वादग्रस्त दृश्य असलेली क्लिप सोशल मिडियावर उघड (व्हायरल) झाली आहे. लघुपटावर तांत्रिक काम करत असताना स्टुडियोतून ती ‘लिक’ झाली असावी अशी शक्यता आहे. या विरोधात अनुराग कश्यपने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सायबर सेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.