‘सेक्स’ हा विषय समाजात वर्जित असल्याने चित्रपटातून तो एक विकाऊ विषय बनल्याचे चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेचे मानणे आहे. लवकरच राधिका ‘हंटर’ या चित्रपटात दिसणार आहे. तारुण्यात पाऊल ठेवलेल्या एका युवकाची ही कथा आहे. या चित्रपटाविषयी बोलताना राधिका म्हणाली, आपल्या देशात ‘सेक्स’बाबत एक अजब अशी परिस्थिती आहे, कारण इथे ‘सेक्स’ विकाऊ पण आहे आणि वर्जितदेखील आहे. ‘सेक्स’ वर्जित असल्यामुळे विकाऊ असल्याचे माझे मानणे आहे. ‘हंटर’ चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरवरून हा चित्रपट एक प्रौढ-विनोदी चित्रपट असल्याचा भास होतो. परंतु, या चित्रपटात आणखी खूप काही आहे. प्रेमकथेवर आधारित असलेला हा एक सामान्य चित्रपट आहे. प्रत्येकजण स्वत:ला या चित्रपटाशी निगडीत असल्याचे अनुभवेल.
(फोटो: बॉलिवूड हंगामा)
चित्रपटातील ‘सेक्स’ हा एक विकाऊ विषय – राधिका आपटे
'सेक्स' हा विषय समाजात वर्जित असल्याने चित्रपटातून तो एक विकाऊ विषय बनल्याचे चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेचे मानणे आहे.

First published on: 16-03-2015 at 06:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika apte sex is saleable because it is a taboo