अभिनेत्री राधिका आपटेनं मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी चित्रपटांपासून ते वेब सीरिज पर्यंत सर्वच बाबतीत राधिकानं स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं आहे. काही चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे ती बरेचदा चर्चेतही राहिली आहे. तर कधी तिच्या चित्रपटातील बोल्ड सीन आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानं ती सोशल मीडियावर चर्चेत आली होती. राधिका आपटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे राधिका पुन्हा चर्चेत आहे आणि तिला अशा अवस्थेत पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये ती निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. हा शर्ट तिच्या पोटाजवळ फाटलेला असून त्या ठिकाणी तिला झालेली जखम ती या व्हिडीओमध्ये दाखवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते देखील हैराण झालेले आहेत. अनेकांना वाटत आहे की राधिका जखमी झालेली आहे. पण यात मोठा ट्वीस्ट आहे.

आणखी वाचा- “दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानं बॉलिवूड हादरलंय” मनोज बाजपेयीचं वक्तव्य चर्चेत

राधिकाच्या या व्हिडीओमध्ये राधिकाच्या पोटावर दिसत असेलेली जखम खरी नाहीये तर तिने एका शूटिंगसाठी केलेला प्रोस्थेटिक मेकअप आहे. हा मेकअप मुंबईतील उकाड्यामुळे वितळत असल्याचं राधिकानं सांगितलं आहे. राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून त्यावर युजर्सच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

आणखी वाचा- ‘किच्चा सुदीपचं वक्तव्य चुकीचं नाही…” कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजय देवगणवर निशाणा

दरम्यान राधिका आपटेनं फक्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. याशिवाय तिनं काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. राधिकाच्या दमदार भूमिकांमुळे तिने अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण बरेचदा तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. काही न्यूड सीनच्या क्लिप्स व्हायरल झाल्यानं तिला सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika apte shared video on instagram goes viral on social media mrj