बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं खणखणीत वाजवल्यानंतर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. गेल्या काही दिवसांपासून राधिका तिच्या आगामी ‘अ कॉल टू स्पाय’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. मात्र याच दरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न केल्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. सध्या राधिका लंडनमध्ये असून तेथील एक फोटो पोस्ट केल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.
करोना विषाणूमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. त्यामुळे या काळात राधिका लंडनमध्ये तिच्या नवऱ्याच्या घरी गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याकाळात ती सोशल मीडियावर सक्रीय असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. तिचे प्रत्येक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यातच तिने एका रेस्तराँमधील फोटो अलिकडेच शेअर केला होता. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला मास्क का लावला नाही असं विचारत ट्रोल केलं आहे.

राधिकाने लंडनमधील एका प्रसिद्ध भारतीय रेस्तराँमधील फोटो शेअर केला होता. यात ती शेफ सुरेंद्र मोहन यांच्यासोबत दिसून येत आहे. परंतु, या फोटोमध्ये राधिका आणि शेफ या दोघांनीही मास्क लावलेला नाही तसंच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालनही करताना दिसत नाही. त्यामुळे राधिकाला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

दरम्यान, फोटो शेअर करत धन्यवाद माझं आदरातिथ्य करण्यासाठी आणि मला घरचं उत्तम जेवणाची चव चाखण्याची संधी दिल्यामुळे मनापासून धन्यवाद. सुरेंदर मोहन तुमचे कर्मचारी फार छान आहेत. मला माझ्या मित्रपरिवारासोबत पुन्हा एकदा इथे भेट द्यायला नक्कीच आवडेल, असं राधिका म्हणाली. तिच्या या फोटोवर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. यात अभिनेत्री सोनम कपूरचाही समावेश आहे. परंतु, काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika apte was seen in indian restaurant in london and then she got trolled for this reason ssj