बॉलीवूडमधील चित्रपट अभिनेत्री राधिका आपटे हिला ‘मॅडली’ या संकलित चित्रपटातील कामगिरीसाठी या वर्षीच्या त्रिबेका चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
‘मॅडली’ चित्रपटाचा भाग असलेल्या ‘क्लीन शेव्हन’मध्ये ३० वर्षांच्या राधिकाने भूमिका केली होती. आंतरराष्ट्रीय कथनात्मक चित्रपटासाठी तिला सवरेत्कृष्ट पुरस्कार देण्यात आल्याचे या महोत्सवाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आले. ‘हंटरर’फेम राधिका आपटे हिने या सन्मानाबद्दल आभार मानताना ‘थँक्यू त्रिबेका!’ असे ट्विटरवरील पोस्टवर लिहिले आहे.

Story img Loader