सुजॉय घोष दिग्दर्शित अहिल्या या चित्रपटात राधिका आपटे कॉन्टेक्ट लेन्स घालून आपली भुमिका साकारणार आहे. या भुमिकेसाठी राधिकाने कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या असून ती कथानकातील नायिका रंगवण्यास महत्वाची असल्याचे राधिकारने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्या हा लघुपट वीस मिनिटांचा असून तो व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे प्रदर्शित केला जाणार आहे. अहिल्या येत्या आठवड्यात प्रदर्शित होत असून राधिकाने याआधी कोणत्याही भुमिकेकरता व खाजगी आयुष्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या नाहीत. यापूर्वी राधिकाने हंटर या चित्रपटात अभिनय केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika apte wore contact lenses for short film