अभिनेत्री राधिका मदानने अगदी कमी वयापासूनच अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलीय. मालिकांपासून ते बॉलिवूड सिनेमांपर्यंत राधिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. हटके भूमिकांसोबतच राधिका तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील राधिका चांगलीच सक्रिय असून बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वीच ब्रालेट परिधान केल्याने राधिका चांगलीच ट्रोल झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने या ट्रोलिंगवर तिचं मत मांडल आहे.

ट्रोलर्सना उत्तर देताना राधिका म्हणाली, “माझ्या लक्षात आहे की सोशल मीडियावर माझे काही फोटो व्हायरल झाले होते. दुसऱ्या दिवशी मी सर्व कमेंट वाचल्या. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी त्यावेळी ट्रोल करणाऱ्यांबद्दल फार विचार नाही केली. मला जे वाटतं ते मी परिधान करते. यावर मला कुणाचं मत घेणं आवडत नाही. हे माझं शरीर आहे आणि मी स्वत:ला कन्फर्टेबल वाटतील असे कपडे मी परिधान करते. मला काय परिधान करायचंय आणि काय नाही किंवा मी कसं दिसायला हवं हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. मी कशी दिसते हे मला चांगलचं माहित आहे आणि मला स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.” असं म्हणत राधिकाने ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावलंय.


राधिकाने ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून अभिनयास सुरुवात केली होती. यावेळी राधिका १९ वर्षांची होती. तर ‘फटाखा’ या सिनेमातून राधिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. दिवंगत अभिनेता इरफान यांच्यासोबत राधिका ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमातही झळकली होती. या सिनेमात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. तर सध्या ‘सिद्दत’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये राधिका व्यग्र आहे. या सिनेमात ती विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत झळकणार आहे.

Story img Loader