Anant Ambani and Radhika Merchant Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींच्या लाडक्या मुलाच्या लग्नाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. अनंत अंबानी आज राधिका मर्चंट हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. बहुचर्चित अशा या लग्नसोहळ्याकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आता पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होतं आहेत. वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत अनंत-राधिकाच्या लग्नासाठी खास पोहोचले आहेत. अशातच अलीकडेच अँटिलियावर पार पडलेल्या शिव शक्ती पूजेचा न पाहिलेला व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी बरेच कार्यक्रम झाले. त्यापैकी एक म्हणजे शिव शक्ती पूजा. बुधवारी १० जुलैला अँटिलिया बंगल्यावर शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. ज्याचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता अंबानींच्या घरी पार पडलेल्या शिव शक्ती पूजेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. ‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर शिव शक्ती पूजेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाला पाहुण्यांची सुरू झाली लगबग; प्रियांका चोप्रा, राम चरण आपल्या कुटुंबासह मुंबईत झाले दाखल

या व्हिडीओत, संपूर्ण अंबानी कुटुंबासहित पाहुणे मंडळी शिव शक्ती पूजा करताना तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. अंबानी कुटुंबातील सदस्य होम, आरती, शिवलिंगावर अभिषेक करताना दिसत आहेत. तसंच हर हर महादेवचा जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. अंबानींच्या घरी झालेल्या या शिव शक्ती पूजेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिव शक्ती पूजा का केली जाते?

दरम्यान, असं म्हटलं जातं की, लग्नाआधी शिव शक्ती पूजा केल्यानं वधू-वरांच्या जीवनात आनंद येतो. तसंच त्यांना भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय नवग्रह शांत होतात आणि जीवन सुखी होते. धार्मिक ग्रंथानुसार रामायणात सीतेनं लग्नाआधी शिव आणि पार्वतीची पूजा केली होती.

हेही वाचा – Video: ‘जवान’ दिग्दर्शक अ‍ॅटलीचा विकी कौशलबरोबर ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात थिरकले

माहितीनुसार, अनंत-राधिकाचं लग्न आज दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika merchant anant ambani wedding shiv shakti puja unseen video viral pps