मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी यंदा लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात राधिका मर्चंटशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहेत. त्याआधी नुकताच जामनगरमध्ये दोघांचा मोठ्या थाटामाटात प्री-वेडिंग सोहळा पार पडला. १ मार्च ते ३ मार्च असा तीन दिवसांच्या या सोहळ्याला देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा देशासह जगभरात अजूनही सुरू आहे. फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच प्री-वेडिंग सोहळ्यात मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेने दिलेल्या भाषणात हॉलीवूड चित्रपटातील संवाद कॉपी केल्याचं समोर आलं आहे. यासंबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका मर्चंट हिने अंबानी कुटुंबासाठी एका भाषणातून भावना व्यक्त केल्या होत्या. मुकेश अंबानींपासून ते श्लोका मेहतापर्यंत अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी राधिका बोलली होती. यावेळी तिने होणारे पती अनंत यांच्यासाठी हृदयस्पर्शी भाष्य केलं. जे ऐकून नेटकऱ्यांना एका हॉलीवूड चित्रपटाची आठवण झाली.

हेही वाचा – जागतिक महिला दिनी ‘राजा येईल गं’ चित्रपटाची घोषणा, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

राधिकाचा हा व्हिडीओ ‘सादिक सलीम’ या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये २००४ साली प्रदर्शित झालेल्या Shall We Dance? या चित्रपटातील संवाद अंबानींच्या होणाऱ्या सूनेने आपल्या भाषणात कॉपी केले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुसान सरंडन हे संवाद म्हणताना दिसत आहेत. तिचे हेच संवाद शब्दशः राधिका बोलताना पाहायला मिळत आहे. ‘विटनेस टु योर लाइफ’ असं या संवादाचे नाव आहे. राधिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी राधिकाला ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिचं समर्थन केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘चॅटजीपीटीने सुद्धा चांगले संवाद लिहून देण्याच काम केलं असतं.’ तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘एवढा पैसा खर्च केला. तर एखाद्या संवाद लेखकाला कामासाठी घेऊ शकला असता.’ तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आता हिला आरामात चित्रपटाच्या ऑफर मिळतील.’ अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा शाहरुख खानसह ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “राधिका…”

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. 