Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: सध्या सर्वत्र एका गोष्टीची अधिक चर्चा रंगली आहे ते म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न. १२ जुलैला अनंत-राधिका सात फेरे घेऊन आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाआधीचे कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात होताना दिसत आहेत. अलीकडेच अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरसह बॉलीवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अशातच आता अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटच्या घरी पार पडलेल्या ग्रह शांती पूजेचा व्हिडीओ समोर आला आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता होणार आहे. अवघे काही दिवस दोघांच्या लग्नाला बाकी राहिले आहेत. त्यामुळे लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ७ जुलैला राधिका मर्चंटकडे ग्रह शांती पूजेचं आयोजन केलं होतं. शैला मर्चंट व वीरेन मर्चंट यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी घरी ग्रह शांत पूजा केली. यावेळी राधिका पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाली.
हेही वाचा – Video: “अरमान मलिकला बाहेर काढा”, विशाल पांडेच्या आई-वडिलांनी भावुक होत ‘बिग बॉस’ला केली विनंती, म्हणाले…
ग्रह शांती पूजेचा व्हिडीओ ‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ग्रह शांती पूजेसाठी पारंपरिक पद्धतीने सजलेली राधिका मर्चंट दिसत आहे. पांढऱ्या रंगाची गुजराती पद्धतीत नसलेली साडी, त्यावर गजरा, नाकात नथ आणि लाल रंगाची टिकली असा सुंदर लूक राधिकाने खास ग्रह शांती पूजेसाठी केला होता. अनेकांनी तिच्या या सुंदर लूकचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा – Video: विकी कौशलसारखा डान्स करताना पृथ्वीक प्रतापच्या आईनं केलं असं काही…; नेटकरी करतायत कौतुक
अनंत अंबानींच्या होणारे सासू-सासरे कोण आहेत?
राधिकाच्या वडिलांचं नाव वीरेन मर्चंट आहे. मुकेश अंबानींच्या दोन व्याह्यांप्रमाणेच हे देखील व्याही श्रीमंत आहेत. राधिकाचे वडील हेल्थकेअर कंपनी एनकोर (Encore)चे सीईओ आहेत. जवळपास त्यांची ७५० कोटींहून अधिक संपत्ती आहे. अनंत यांच्या होणाऱ्या सासूचं नाव शैला मर्चंट असं आहे. त्या एक बिझनेस वूमन असून एनकोर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. याआधी शैला मर्चंट यांनी अनेक कंपन्यांमध्ये संचालक पदी काम केलं होतं. राधिकाच्या आईचं नेटवर्थ १० कोटी असल्याचं म्हटलं जातं आहे.