Anant Ambani And Radhika Merchant Griha Pravesh : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा मुंबईतल्या बीकेसी परिसरात १२ जुलै रोजी थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. अनंत-राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींपासून जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा होती. या दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला होता. यानंतर या जोडप्याच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचं आयोजन इटली ते फ्रान्स दरम्यान जाणाऱ्या क्रुझवर करण्यात आलं होतं. या दोन्ही सोहळ्यांना बॉलीवूडसह अनेक हॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर अंबानींच्या नव्या सुनेचं त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालियामध्ये स्वागत करण्यात आलं होतं.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

राधिका मर्चंटचा जामनगरमध्ये गृहप्रवेश ( Radhika Merchant )

अनंत-राधिका मुंबईतील लग्नसोहळा आटपून लंडनमध्ये आणखी एक सेलिब्रेशन करणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. परंतु, हे जोडपं रविवारी रात्री जामनगरमध्ये दाखल झालं. अनंतचा जन्म जामनगरमध्ये झाल्याने अंबानी कुटुंबीयांचं या शहराशी जवळचं नातं आहे. त्यामुळे राधिकाचा गुजरातच्या घरात भव्य गृहप्रवेश करण्यात आला.

राधिका मर्चंटने जामनगरच्या घरी माप ओलांडून गृहप्रवेश केला. सर्वांनी मोठ्या आनंदाने या जोडप्याच्या स्वागत केलं. याचा व्हिडीओ अंबानी अपडेट्स या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. राधिका-अनंतच्या गृहप्रवेशाचा हा Inside व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “माझ्याबरोबर चुकीचं वागणारे आता भोगत आहेत”, घटस्फोटाबाबत अनिकेत विश्वासरावचं भाष्य; म्हणाला, “हायकोर्टाने निर्णय…”

anant
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न ( Anant Ambani & Radhika Merchant )

हेही वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल येणार का? सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “लक्ष्याशिवाय…”

दरम्यान, अनंत – राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना खास वाराणसीच्या संस्कृतीचं तेथील ऐतिहासिक वारसा, भारतीय परंपरा याचं दर्शन घडलं. मुलाच्या लग्नाआधी प्रार्थना करण्यासाठी नीता अंबानी काही दिवसांपूर्वी काशीला गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनी अनंत-राधिकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर, शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, बच्चन कुटुंबीय, कपूर कुटुंबीय या सेलिब्रिटींशिवाय राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

Story img Loader