Radhika Merchant Birthday Bash Video: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाने म्हणजे अनंत अंबानीने १२ जुलैला राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधली. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका आता अंबानींची धाकटी सून झाली आहे. गुरुवारी ( १७ ऑक्टोबरला ) राधिका मर्चंट हिचा ३०वा वाढदिवस होता. लग्नानंतरचा राधिकाचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दीर आकाश अंबानी राधिकाकडून केक खाण्यास नकार देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये राधिका पांढऱ्या रंगाचा बॅकलेस टॉपसह लाल स्कर्टमध्ये दिसत आहे. यावर तिने साजेसी हेअरस्टाइल आणि मेकअप केला आहे. या लूकमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, राधिका केक कापताना पाहायला मिळत असून सर्वजण टाळ्या वाजवून तिला शुभेच्छा देत आहेत. त्यानंतर राधिका सर्वांना केक भरवताना दिसत आहे. ती पहिल्यांदा नवरा अनंतला केक भरवते. मग मुकेश अंबानी स्वतःहून पुढे येऊन राधिकाला केक भरवतात. नंतर राधिका आपले आई-वडील, बहिणीला केक भरवते आणि दीर आकाशला केक भरवायला जाते. पण, आकाश अंबानी केक खाण्यास नकार देतो. कारण तिथे आजी कोकिलाबेन अंबानी उभ्या असतात. त्यामुळे आकाश राधिकाला आजीला पहिल्यांदा केक भरवण्यासाठी सांगतो. त्याप्रमाणे राधिका आजी सासू आणि मग सासू नीता अंबानींना केक भरवताना दिसत आहे.
त्यानंतर आकाश अंबानी आजी पौर्णिमा दलाल यांचा हात पकडून त्यांना पुढे घेऊन येतो आणि राधिकाला केक भरवण्यास सांगतो. आकाश अंबानीच्या या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कौतुक केलं जात आहे. आकाश जेंटलमॅन असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
दरम्यान, राधिका मर्चंटच्या ३०व्या वाढदिवसाला क्रिकेटकर महेंद्रसिंग धोनी, ओरी, अनन्या पांडे, शिखर पहाडिया, जान्हवी कपूर, अर्जुन कपूरसहित अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.