Radhika Merchant Praises Mother In Law Nita Ambani : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मुंबईतील बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये शुक्रवारी (१२ जुलै) पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. एकूण तीन दिवस बीकेसीमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींसह परदेशातील अनेक दिग्गज या लग्नकार्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. यासाठी संपूर्ण जिओ सेंटरचा परिसर सजवण्यात आला होता. एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी अनेक महिने आधीपासून तयारी करावी लागते. या सगळ्याची जबाबदारी अनंतच्या आई नीता अंबानींनी सांभाळली होती. नुकत्याच वोगला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने आपल्या सासूबाईंचं भरभरून कौतुक केलं आहे.
राधिका नीता अंबानींबद्दल काय म्हणाली?
सासूबाई नीता अंबानींचं कौतुक करताना राधिकाने त्यांना “आमच्या लग्नाच्या CEO” असं म्हटलं आहे. याबाबत वोगला दिलेल्या मुलाखतीत अंबानींची नवीन सूनबाई सांगते, माझ्या सासूबाई आमच्या लग्नाच्या CEO होत्या. त्यांनी या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या पुढाकारामुळे हा भव्य सोहळा सुंदररित्या पार पडला आणि हे सेलिब्रेशन आमच्या कायम आठवणीत राहणार आहे.
हेही वाचा : “ऐश्वर्या माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान…”, वयावरून ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकर म्हणाले, “आम्ही दोघं…”
ईशा आणि श्लोका या दोघीजणी सुद्धा प्रत्येक गोष्टीत आवर्जुन लक्ष घालत होत्या. याशिवाय अंबानी कुटुंबीयांबरोबर वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी, इव्हेंट मॅनेजर या सगळ्यांनी आठवडाभर न थकता काम केलं. याशिवाय राधिका म्हणाली, “१२, १३ व १४ जुलै या तारखांची निवड आम्ही आधीपासून ठरवून केली होती. या तारखा आमच्या कौटुंबिक ज्योतिषाने आम्हाला सुचवल्या होत्या. अनंत व माझी जन्मपत्रिका पाहून त्यातल्या संरचना, ग्रह या सगळ्या गोष्टी पाहून आमच्या लग्नतारखा ठरवण्यात आल्या होत्या.”
राधिका-अनंतच्या लग्नात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील मोठी तयारी करण्यात आली होती. लग्नात ए-लिस्टर स्टार्स, क्रिकेटर्स आणि व्यावसायिकांसाठी वेगळा झोन तयार करण्यात आला होता. दरम्यान, थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर अनंत-राधिका मंगळवारी रात्री जामनगरला रवाना झाले आहेत. त्याठिकाणी या जोडप्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यापूर्वी मार्च महिन्यात अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरला पार पडला होता. यासाठी सुद्धा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.