सिनेइंडस्ट्रीत सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून नंतर राजकारणाची वाट धरणारे अनेक कलाकार आहेत. स्मृती इराणी, नगमा आणि आता कंगना रणौत अशा अनेक अभिनेत्रींनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला आणि तिकडेच स्थिरावल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने १९७८ साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत. तीन लग्नं अन् आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्रीने २००६ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचं नाव राधिका सरथकुमार आहे. तिने १९७८ साली आलेल्या ‘किझाक्के पोगम रेल’ या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनयाव्यतिरिक्त राधिका सरथकुमार ही रदान मिडिया वर्क्स लिमिटेडची संस्थापक आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसर देखील आहे. तिने १९७९ साली हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं, पण १९८६ साली आलेल्या ऋषी कपूर आणि फराह नाझ यांच्या ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. हा १९८२ मध्ये आलेल्या ‘गोपुरंगल सैवथिल्लई’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता.

kshitee jog mugdha karnik
‘पारू’ फेम मुग्धा कर्णिक क्षिती जोगबरोबरच्या मैत्रीबद्दल म्हणाली, “मी कुठल्या अडचणीत…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
nikki tamboli and usha nadkarni will visit maharashtrachi hasya jatra
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पोहोचल्या निक्की तांबोळी अन् उषा नाडकर्णी! कोकणातील पारंपरिक गाण्यावर धरला ठेका, पाहा प्रोमो

‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!

राधिका सरथकुमारने २००६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एआयएडीएमके पक्षात प्रवेश केला होता, पण तिने २००७ मध्ये राजीनामा दिला तोवर ती ऑल इंडिया समथुवा मक्कल काचीची उपाध्यक्ष होती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राधिका सरथकुमार विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.

अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”

राधिकाने फेब्रुवारी २००१ मध्ये अभिनेता सरथकुमारशी लग्न केलं. लग्नापूर्वी ते मित्र होते आणि त्यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या जोडप्याला २००४ मध्ये मुलगा झाला. त्याचं नाव राहुल आहे. खरं तर राधिकाने सरथकुमार यांच्याशी तिसरं लग्न केलं होतं. तिचं पहिलं लग्न १९८५ साली प्रताप पोथनशी झालं अन् वर्षभरात १९८६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग तिचं दुसरं लग्न १९९० मध्ये रिचर्ड हार्डीशी झालं. पण तो संसारही दोन वर्षांतच मोडला. या लग्नापासून राधिकाला रायने नावाची मुलगी झाली. रायने हार्डी हिचा जन्म १९९२ मध्ये झाला होता आणि तिने क्रिकेटपटू अभिमन्यू मिथुनशी लग्न केलं आहे. तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

भव्य सेट, खरे दागिने अन्…; संजय लीला भन्साळींनी घेतले ६० कोटी, ‘हीरामंडी’चं बजेट किती? कोणाला किती मानधन मिळालं?

दुसरीकडे राधिकाचे पती सरथकुमार यांचं पहिलं लग्न छाया देवीशी झालं होतं. १९८४ ते २००० अशा १६ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. त्यांना वरलक्ष्मी आणि पूजा या दोन मुली होत्या. त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राधिकाशी लग्न केलं. आता ते २० वर्षांहून अधिक काळ सुखाने संसार करत आहेत.

Story img Loader