बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. टीझरमधील चष्मा घातलेला आणि दाढी वाढवलेल्या शाहरूखचा लूक नेहमीप्रमाणेच लोकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. टीझर पाहिल्यानंतर या चित्रपटातील भूमिका शाहरूखच्या नेहमीच्या रोमँटिक भूमिकांपेक्षा वेगळी असेल याचा अंदाज येतो. यामध्ये शाहरूखच्या तोंडी असणारा ‘बनिये का दिमाग और मियाँभाई की डेरिंग’ हा संवादही येणाऱ्या काळात लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. १९८०च्या दशकात गुजरातमध्ये अवैध दारूचा धंदा चालवणारा एक माणूस आणि त्याचा पोलीसांशी असलेला संघर्ष या कथानकावर ‘रईस’ आधारित आहे. यापूर्वी शाहरूखने ट्विटरवरूनच या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले होते. विशेष म्हणजे ‘रईस’ हा सिनेमा २०१६  मध्ये ‘ईद’ला सलमान खानच्या ‘सुलतान’सोबतच प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा