पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा नुकताच एका व्यक्तीला चप्पलने मारहाण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती. या घटनेबद्दल राहत फतेह अली खान यांनी मौन सोडलं आहे. आपण या प्रकरणी नोकर नावेदची माफी मागितली आहे, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर राहत फतेह अली खान यांनी सोशल मीडियावर याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. या घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले. “मी त्याची माफी मागितली आहे. तो रडायला लागला आणि म्हणाला, ‘सर तुम्ही असं का करत आहात?’ मी त्याचा गुरू आहे. मी त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याच्याशी वागलो.”
प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर
ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना राहत फतेह अली खान म्हणाले, “तो माझ्या घरी राहतो. मी त्याला खेचलं, मारलं आणि रागावलो, हे जाहीरपणे स्वीकारलं आहे आणि नंतर मी माफीही मागितली. इथपर्यंत ठीक होतं पण लोक याची खिल्ली उडवत आहेत. लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही. त्याच्याजवळ माझे पवित्र पाणी होते, माझ्यासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे कारण त्याच्याशी माझा आध्यात्मिक संबंध आहे.”
दरम्यान, या घटनेनंतर नोकरानेही स्पष्टीकरण दिलं होतं. दारूच्या बाटलीमुळे नव्हे तर पवित्र पाण्याच्या एका बाटलीवरुन वाद उद्भवला होता. राहत हे त्यांच्या शिष्यांवर प्रचंड प्रेम करतात, त्यांना उगाच बदनाम करण्यासाठी या गोष्टी पसरवल्या जात असल्याचं तो नोकर म्हणाला होता.