प्रचारात व्यस्त असलेले राहुल गांधी बऱ्याचवेळा आपल्या खुरट्या दाढीतील रूपात भाषणबाजी करतांना दिसून येतात. असे रूप ठेवण्यापेक्षा त्यांनी नित्यनेमाने स्वच्छ दाढी करावी, असा सल्ला अभिनेत्री नेहा धुपियाने कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.
जिलेट रेझरच्या नव्या श्रेणीची प्रसिध्दी करण्यासाठी नेहा धुपिया येथे आली होती. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंन्द्र मोदींसारखे दाढी वाढलेले व्यक्तीमत्व न ठेवता, या तरुण राजकीय नेत्याने विनादाढीचे आकर्षक व्यक्तीमत्व धारण करावे असे नेहाला वाटते.
नेहा म्हणाली, मागील काही दिवसांपासून राहुल गांधी विविध रूपात आपल्या समोर येत आहेत. परंतु, त्यांना स्वच्छ दाढी केलेल्या स्वरूपात पाहयला मला आवडेल, कारण त्या रुपात ते अधिक आकर्षक दिसतात. मोदींचे रूप सर्वसाधारण झाले आहे. परंतु, राहुल त्यांच्यापेक्षा तरूण असल्याने विना दाढीचे आकर्षक रूप धारण करू शकतात.
दाढी ठेवलेल्या पुरूषांचे व्यक्तिमत्व मुलींना आवडत नसल्याचे या ३३ वर्षीय माजी सुंदरीचे म्हणणे आहे. आजच्या पिढीला सचिन तेंडूलकर आणि आमिर खान आवडतात, यावरून सर्व काही स्पष्ट होत असल्याचे ती म्हणाली.

Story img Loader