टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर राहुल राज सिंग याच्या सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राहुल राज याने नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्युषाच्या बँक खात्यातील २४ लाख रूपये उडवल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्युषाच्या पालकांनी पोलिसांना ही माहिती दिली असून राहुल अनेकदा प्रत्युषाच्या खात्यातून पैसै काढत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्रत्युषाच्या बँक खात्यात एकही पैसा उरलेला नाही. प्रत्युषाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गायब झाला होता. याबाबत पोलिस तपास सुरू असून तो प्रत्युषाला मारहाण करत असल्याची माहितीही पोलीस तपासात पुढे आली होती. पोलिसांनी राहुल आणि प्रत्युषाचे मोबाईल फोन ताब्यात घेतले असून त्यात पोलिसांना अनेक गोष्टी सापडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राहुलवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, सध्या तो कांदिवली येथील रूग्णालयात मानसिक आजारावरील उपचार घेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा