आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. १३ डिसेंबर रोजी स्मिता पाटील यांची पुण्यतिथी. स्मिता पाटील यांनी बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांच्याशी लग्न केले होते. आता पत्नीच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज यांनी एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राज बब्बर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये स्मिता पाटील यांनी वांगी रंगाची साडी नेसली आहे. या फोटोमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी, ‘स्मिता ही खूप चांगली व्यक्ती होती. तिचे अस्तित्व सर्वांना आकर्षित करायचे. पण तिची सर्वांत वेगळी गोष्ट म्हणजे ती एक संवदेशील व्यक्ती होती. खूप कमी वेळात तिने अनेकांच्या मनात घर केले. मला आज तिची मनापासून आठवण येत आहे’ या आशयाची पोस्ट केली.
आणखी वाचा : अखेर हिंदी अभिनेत्रीने मागितली ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकाराची माफी, म्हणाली…
स्मिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण ‘आज की आवाज’ चित्रपटातील त्यांची आणि अभिनेता राज बब्बर यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. त्यानंतर स्मिता आणि राज बब्बर यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होता. त्यावेळी राज बब्बर विवाहीत असून त्यांना दोन मुले होती. म्हणून स्मिता यांच्या आईने त्यांच्या आणि राज यांच्या नात्याला नकार दिला होता. मात्र स्मिता यांनी कोणाचाही विचार न करता राज यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. ८०च्या दशकात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणे ही खूप मोठी गोष्ट होती.